Saturday, 30 November 2024

भिमराव माझा तो राजांचा राजा

भिमराव माझा तो राजांचा राजा,

नसला तर नसू दे नोटामधी 

काय सांगु दादा तुला भिमराव दिसे मला, 

पाण्याच्या घोटामधी ll धृ ll 


पाण्यासाठी जवा आमचा जीव तळमळ 

खुलं केल भिमान ते चवदार तळ

निसर्गरम्य दाही दिशेला,

वाहतया पाणी पाटापाटामधी ll १ll


पनवेलच्या नाक्यावरणी घडली नवलाई 

तान्हेल्या भिवाला कुणी दिलं नाही पानी 

सोनबा यवले, लाकूडतोड्या 

पाणी घेऊन आला माठामधी ll २ll


आहो गांधी नेहरू आहेत माझ्या भीमाचे ते ऋणी 

माझ्या भिमासारखे ते शिकले नव्हते कुणी 

नोटावरती त्यांची निशाणी,पण 

ईमानी नव्हती त्यांच्या पोटामधी ll ३ll


छातीठोक जगाला हे सांगे सोपान 

भिमापुढे पंडीतांनी झुकविली मान 

दिनजनांच्या बहुजनांच्या 

जयभीम काळजाच्या देठामधी ll ४ll


गीतकार:- सोपान कोकाटे 

गायक :- विजय सरतापे आणि वैभव खुणे 

संगीत :- विक्रांत मिलींद मोहिते/मनोज मोहिते

अल्बम :- भिमराव माझा तो राजांचा राजा

No comments:

Post a Comment