Sunday, 17 November 2024

मतदानाला नक्की जाणार

 मतदानाला नक्की जाणार 

----------------@----------------


चाल :- भीमराज कि बेटी मै तो जय भीम वाली हु 


पक्का ध्यानात आलाय माह्या मताचा अधिकार 

मत द्यायला नक्की जाणार गड्या हक्क बजावणार ll धृ ll


काल गावात गुरुजी आले मले हक्क सांगून गेले 

पोरांनी नारे दिले मतदानाचे महत्त्व पटले 

आलीत कामे किती जरीही बटन हे दाबणार ll १ll


मतदानाचं केंद्र छान दिव्यांगाची आहे जान 

व्हीलचेरचे वाहन करू मतदान थाटान 

चढण्या उतरण्यासाठी आहे रँपाचा उतार ll २ll


रविकांतासाठी आहे ब्रेल लिपीची ही सोय 

सावली आहे का तिथे?या प्रश्नाचे उत्तर होय 

तुळसा मंजुळासाठी आहे पिण्याचे पाणी गार ll३ ll


अंभोरे सरांनी चांगलं कर भीमराव थांबतो चांगलं 

ज्या सर्वांना घेऊन पहीलं जरी म्हातारं ते खंगलं 

मदतीला BLO स्वयंसेवक चिंता ही मिटणार ll ४ll


कवी/ गायक:- साहेबराव अंभोरे (विषय शिक्षक) 

जिल्हा परिषद मराठी उच्च प्राथमिक शाळा पांगरखेड तालुका:- मेहकर          जिल्हा:- बुलढाणा






No comments:

Post a Comment