चाल:- शुभमंगल होऊ जाऊ दे मंगला
दोन नोव्हेंबर दिन हा चांगला
वाढदिवस पुनमचा रंगला
पंचशीला त्रिशरणाने गंधला || धृ ||
पिता पुरुषोत्तम हे थोर
माता कल्पना संस्कारी फार
उघडी धम्मसहलीचे द्वार
बुद्धधम्माचे ते जाणकार
बुध्दविहार जणू तो बंगला || १||
सासू पद्माबाई गुणी
किती सुनेचं कौतुक मनी
सासरे प्रकाशची मंजुळ वाणी
प्रज्ञावंत, हा दिलदार धनी
रत्नदीप हा धम्मात दंगला ||२||
उपर्वटांची लेक निर्मळ
करी गतिमान धम्म चळवळ
ज्ञानदानाची असे तळमळ
दीनजनांची हि कळवळ
सून सम्दुरची ऐक तू मंगला ll३ll
योगायोग हा खासच आला
वाढदिवस धम्मसहलीला
कर जोडूनी गौतम बुद्धांला
देतो शुभेच्छा पूनमताईला
सुख आनंद मिळो जीवनाला
मागणे अर्हत तथागतांला
अंभोरे सर गाण्यात गुंगला ll४ll
कवी गायक:- साहेबराव अंभोरे
वैशाली (बिहार)
दिनांक:- २/११/२०२४, शनिवार
वेळ:- सकाळी ८ ते १०:४५
--------------------@--------------------
No comments:
Post a Comment