Saturday, 30 November 2024

मराठी शब्दकोडे

 मराठी शब्दकोडे 

कोडे 1) मुकूट याच्या डोक्यावर, जांभळा­ झगा अंगावर 

उत्तर:- वांगं 


कोडे 2) एका माणसाचे चार अक्षरी नाव काय?

            ज्याचे पहिले व दुसरे अक्षर म्हणजे त्याच्या       

             बायकोचे नाव !दुसरे व तिसरे अक्षर म्हणजे         

             त्याच्या मुलीचे नाव तिसरे व चौथे अक्षर    

             म्हणजे त्याच्या मुलाचे नाव

             व चारही अक्षर म्हणजे त्याचे नाव

             सांगा पाहु ते नाव काय?🤔

उत्तर : सीताराम


कोडे 3) कोडेप्रश्न असा आहे कि उत्तर काय?🤔

उत्तर : दिशा


कोडे 4) पुरूष असून पर्स वापरतो, वेडा नसून कागद फाडतो🤔

उत्तर : कंडक्टर/ बस वाहक


कोडे 5) पाणी नाही, पाऊस नाही, तरी रान कसं हिरवं ,

कात नाही,चुना नाही, तरी तोंड कसं रंगल🤔

उत्तर: पोपट


कोडे 6) पाटिल बुवा राम राम, दाढी मिशा लांब लांब 🤔

उत्तर: कणीस


कोडे 7) पांढरं पातेल पिवळा भात 🤔

उत्तर: अंड


कोडे 8) दोन भाउ शेजारी, भेट नाही जन्मान्तरी 🤔

उत्तर: डोळे


कोडे 9) थई थकड धा.. तीन डोकी पाय धा 🤔

उत्तर: दोन बैल, नांगर आणि एक माणूस (शेत नांगरणारा)


कोडे 10) तीनजण वाढायला , बाराजण जेवायला 🤔

उत्तर: घड्याळ


 कोडे 11) तीन पायांची तिपाई, वर बसला शिपाई 🤔

उत्तर: चूल आणि तवा 



कोडे 12) तिखट, मीठ, मसाला चार शिंग कशाला 

🤔उत्तर: लवंग




कोडे 13) लाल आहे पण रंग नाही, कृष्ण आहे पण देव नाही, 

आड आहेपण पाणी नाही, वाणी आहे पण दुकान नाही 🤔

उत्तर: लालकृष्ण आडवाणी


कोडे 14) सगळे गेले रानात,अन् झिपरी पोरगी घरात 🤔

उत्तर: केरसुणी



कोडे 15) सुपभर लाह्या त्यात एक रुपया🤔

उत्तर: चंद्र आणि चांदण्या



कोडे 16) सोन्याची सुरी ,भुईत पुरी,

               वर पटकार, गमजा करी 🤔

उत्तर: गाजर



कोडे 17) हजार येती हजार जाती,हजार बसती 

             पारावर,अशी नार ती आईसम हजार खेळवी 

             अंगावर 🤔

उत्तर: बस /ट्रेन.



कोडे 18) हिरवी पेटी काट्यात पडली,

              उघडून पाहिली तर मोत्याने भरली 🤔

उत्तर: भेंडी

 



कोडे 19) चार खंडांचा एक शहर,चार विहीरी बीना पानी,

               अठरा चोर आहेत त्या शहरी आणि एक राणी 

               एक शिपाई सगळ्यांना टाकी विहीरीत मारुनी !!🤔

उत्तर: कॅरम बोर्ड गेम


कोडे 20)  कोकणातूनं आली माझी सखी, रंग धवलआहे चकाकी

                मानेवर तिच्या दिली बुक्की,तिच्या घरभर पसरल्या लेकी

उत्तर: लसूण🤔


कोडे 21) कोकणातनं आली नार,तिचा पदर हिरवागार,

              तिच्या­ काखेला प्वार🤔

उत्तर: काजू (फळासकट)


कोडे 22) कोकणातनं आला रंगूकोळी,त्यानं आणली भिंगू चोळी,

              शिंपीण म्हणते शिवू कशी,परटीण म्हणते धुवू कशी,

             अन् राणी म्हणते घालू कशी 🤔

उत्तर: कागद


कोडे 23) कोकणातनं आला भट ,धर की आपट 🤔

उत्तर: नारळ


कोडे 24) कुट कुट काडी पोटात नाडी,राम जन्मला हातजोडी 

              कृष्ण जन्मला हात जोडी🤔

उत्तर: देवर्‍यातील घण्टी / टाळ.


कोडे 25) काळ्या रानात हत्ती मेला,त्याचा पृष्ठभाग ऊपसून नेला🤔

उत्तर: कापुस


कोडे 26) काट्याकुट्या­चा बांधला भारा,कुठं जातोस ढबुण्या पोरा🤔

उत्तर: फणस


कोडे 27) कांड्यावर कांडी सात कांडी,त्याच्यावर समुद्राची अंडी 🤔

उत्तर: ज्वारीचे कणीस


कोडे 28) एवढीशी नन्नुबाय,साऱ्या वाटेनं गीत गाय 🤔

उत्तर: शिट्टी


 कोडे 29) एवढस कार्टं,घर कसं राखतं 🤔

उत्तर: कुलूप


 कोडे 30) इथेच आहे पण दिसत नाही 🤔

उत्तर:-वारा


कोडे 31) आहे मला मुख,परंतु खात नाही,

               दिसते मी झोपलेली,पण असते पळतही,

               माझ्याशिवाय तुमचे,जगणेच शक्य नाही

               वहा तुम्ही माझी,थोडीशी कळजीही, 

               मी कोण काढा शोधुन,नाहीतर बें म्हणा मागून 🤔

उत्तर: नदी


कोडे 32) आटंगण पटांगण लाल लाल रान,

               अन् बत्तीस पिंपळांना एकच पान 

उत्तर: तोंड(दात आणि जीभ)


कोडे 33)दिवसा झोप काढुनी मी,फिरतो बाहेर रात्रीला मी

             आहे असा प्रवासी मी,पाठीला दिवा बांधून मी

              कोण आहे मी ?

उत्तर :- काजवा ☑️

 

कोडे 34)एका माणसाला बारा मुले,काही छोटी काही मोठी

              काही तापट तर काही थंड,ओळखा पाहू मी कोण?

उत्तर :- वर्ष ☑️


कोडे 35)भाऊराया माझा खूप शैतान,बसतो माझ्या नाकावर

               पकडून माझे कान सांगा आहे मी कोण तर ?

उत्तर :- चष्मा ☑️


कोडे 36)दोन बोटांचा रस्ता..त्यावर चाले रेल्वे..

            लोकांसाठी आहे उपयोगाची..काही सेकंदात आग लावते..

उत्तर :- माचीस काडी (मॅचस्टीक) 


कोडे 37)अशी कोणती गोष्ट आहे

             पती आपल्या पत्नीला देऊ शकतो?

             परंतु पत्नी आपल्या पतीला देऊ शकत नाही.

उत्तर :-आडनाव (surname) 


कोडे 38)लई धाकड हा,तीन डोके आणि पाय दहा

उत्तर :- दोन बैल आणि एक शेतकरी ☑️


कोडे 39)एक कपिला गाय,आहेत तिला लोंखडी पाय

             राजा बोंबलत जातो,पण ती थांबत नाही

उत्तर :- रेल्वे ☑️


कोडे 40)संपूर्ण गावभर मी फिरते ,तरीही मंदिरात जायला घाबरते

             सांगा पाहू मी आहे तरी कोण

उत्तर :- चप्पल ☑️


कोडे 41)एक लाल गाई

             नुसती लाकूड खाई

             जर पाणी पिले

             तर मरून ति जाई

             ओळखा पाहू मी कोण

उत्तर :- आग ☑️


कोडे 42)आम्ही दोघे जुळे भाऊ

             एकाच रंगाचे आणि एकच उंचीचे

             सोबत असता खुप कामाचे

              एक हरविता नाही काम दुसऱ्याचे

उत्तर :- चप्पल ☑️


कोडे 43)तो वेडा नाही तरीही कागद फाडतो

            तो पोलिस नाही तरीही तो खाकी घालतो

            मंदिर नाही तरीही घंटा तो वाजवतो

            सांगा पाहू मी कोण?

उत्तर :- वाहक {Conducto


कोडे 44)मातीविना उगवला कापूस लाख मन

             पडला मुसळधार पाऊस तरीही भिजला नाही एकही कन

             ओळखा पाहू मी कोण

उत्तर :- ढग ☑️


कोडे 45) बारीक असते लांब पण असते तरीही मी काठी नाही

              दोन तोंडे आहेत मला तरीही मी गांडूळ नाही

              श्वास घेते मी पण तुम्ही नाही

उत्तर :- बासरी ☑️


कोडे 46) दगड फोडता चांदी चकाकली

              चांदीच्या आडात मिळाले पाणी

              सगळे म्हणाले ही परमेश्वराचीच करणी

              ओळखा पाहू मी कोण

उत्तर :- नारळ ☑️


कोडे 47) जगाच्या खबरी साठवून ठेवतो खूप मोठे माझे पोट

              म्हणूनच तर प्रत्येक सकाळी पाहतात सर्वजण माझी वाट

उत्तर :- वर्तमानपत्र ☑️


कोडे 48) पांढरे माझे पातेले

              त्यात ठेवला पिवळा भात

              ओळखेल मला जो कोणी

              त्याच्या कमरेत घाला लाथ

उत्तर :- उकडलेले अंडे ☑️


कोडे 49)मी तिखट मीठ मसाला

              मला चार शिंगे कशाला

              सांगा पाहू मी आहे तरी कोण

उत्तर :- लवंग ☑️


कोडे 50)एक सूप भरून लाह्या

             त्यात फक्त एक रुपया

उत्तर :- चंद्र आणि चांदण्या ☑️


कोडे 51) हरी झंडी

 लाल कमान,

              तोबा तोबा करे इंसांन….

उत्तर :- मिरची


52) बत्तीस भाऊ एकच बहीण 

       सर्वात तीच आयुष्यमानीन

उत्तर:- जीभ


53) बारा घरावर दोघे,पहारा करती

      न थकती,न थांबती ,सदैव फिरती

उत्तर:- घड्याळ




No comments:

Post a Comment