Saturday, 16 November 2024

जाऊ जोडीन मतदानाला

20 नोव्हेंबर दिनी ग मंगला 

जाऊ जोडीन मतदानाला

घेऊ सोबत बाबा आईला  ll धृll 


हा आयोग देतोया ग्वाही

तिथे कमी कशाची नाही 

डाव्या तर्जनीला लावू शाई 

करू बळकट ही लोकशाही 

जागु आपल्या या कर्तव्याला ll 1ll


आहे लोकशाहीचा सण 

दोघ जोडीने घेऊया प्रण

करू हक्काने हे मतदान 

नाही घ्यायचं कुणाचं नाणं 

ना जायचं बाहेर गावाला ll2 ll 


ओळखपत्र सोबत घेऊ

मतदानाला लवकर जाऊ 

काम धंदे बाजूला ठेवू 

मतदानाला प्राधान्य देऊ

BLO ने संदेश दिला ll3ll 


थंड सावली आणिक पाणी

चल लवकर माझे तू राणी 

दाबू बटन हे थाटानी

देऊ योग्य माणूस निवडूनी

आहेत अंभोरे सर संगतीला ll4ll 


कवी /गायक:- साहेबराव अंभोरे

दिनांक:-११/११/२०२४


No comments:

Post a Comment